हुपरी शहरालगत असणाऱ्या माळी पेट्रोल पंप परिसरात बिबट्यासदृश्य प्राणी दिसल्याची घटना मंगळवार दिनांक १० सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. पट्टणकोडोलीच्या दिशेने दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन चांदी व्यापाऱ्यांनी ही दृश्ये पाहिल्याचे सांगितले आहे. अचानक समोरून आलेल्या या बिबट्यासदृश्य प्राण्यामुळे काही क्षण त्यांची दुचाकी थांबली.प्राणी काही काळ रस्त्यावर थांबून जवळील स्मशानभूमीच्या दिशेने निघून गेला, असे त्यांनी सांगितले.