बटाणा येथे अचानक लागलेल्या आगीत तीन घरे जळून खाक झाले. आगीत तिन्ही घरातील अन्न धान्यासह जीवनावश्यक वस्तू भस्मसात झाली. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहाणी झाली नसली तरी तिन्ही घरमालकांचे जवळ पास 40 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे शेतीचे मोटर पंप व इतर साहित्य जळून खाक झाले घरी ठेवलेले धान्य घरगुती कपडे दागिने व रोख रक्कम जळून राख झाली सचिन रंहागडाले,नूतनलाल रंहागडाले, छत्रपाल रंहागडाले अशी पीडित घरमालकांची नावे आहेत.