मालेगाव तालुक्यातील खलाणे येथे जेसीबी दरीत कोसळून आगीत जळून खाक Anc: मालेगाव तालुक्यातील खलाणे येथे काल दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 9 वाजेचे सुमारास जेसीबी दरीत कोसळून आगीत जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री नऊच्या सुमारास मधुकर जिभाऊ जाधव यांच्या बंगल्याच्या पाठीमागील भागात कोरा काढण्याचे काम सुरू होते. काम करताना ड्रायव्हरच्या दुर्लक्षामुळे जेसीबीचा तोल गेला आणि ती थेट दरीत कोसळली. कोसळताच मशीनला अचानक आग लागली.