पांढरकवडा शहरातील आखाडा वार्डातील एका सार्वजनीक स्थळी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या पथकाने मारलेल्या धाडीमध्ये पाच जणांना जुगार खेळतांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांच्या जवळुन रोख रक्कमेसह २ लाख ८६ हजाराचा मुद्देमाल गप्प करण्यात आला ही कारवाई पोलिसांनी दिनांक 3 सप्टेंबर रोजी साडेचार च्या दरम्यान केली.