कोण कशाची चोरी करेल हे काही सांगता येत नाही, अशीच एक घटना बदलापूर परिसरात घडली आहे. बदलापूर मधील एका दुकानांमध्ये महिला काहीतरी खरेदी करण्यासाठी गेली होती मात्र दुकानदाराची दुर्लक्ष आहे हे तिच्या लक्षात आल्यानंतर दुकानाच्या काउंटरवर ठेवलेली चकलीची पिशवी उचलली आणि ती तेथून पसार झाली. मात्र चकली चोर महिलेचा सर्व प्रताप दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून सीसीटीव्ही व्हिडिओ काल रात्रीपासून व्हायरल होत आहे.