ऊसतोड कामगार पुरविण्याच्या बहाण्याने एका शेतकऱ्याची तब्बल ७ लाख २० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कैलास पिराजी दातरे (रा. तालीम, ता. पुर्णा, जि. परभणी) याच्याविरुद्ध पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आत्माराम शंकर धोत्रे (वय ६५, रा. शेवते, ता. पंढरपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी कैलास दातरे याने ऊसतोड कामगार पुरविण्यासाठी पैशांची मागणी केली होती.