औसा -औसा तालुक्यातील किल्लारी येथे असलेल्या ओम पेट्रोल पंपावर सोमवार, दि. १ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास थरारक घटना घडली.पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या चार जणांनी किरकोळ कारणावरून पंपावरील कर्मचाऱ्याशी वाद घातला. वाद वाढत जाताच चौघांनी मिळून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. अचानक घडलेल्या या घटनेनंतर पंपावर मोठा गोंधळ उडाला. मारहाण करणारे आरोपी पंपावर उद्धटपणे वागत असल्याचे व कर्मचाऱ्याला मारहाण करत असल्याचे दृश्य CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले आहे.