ठाणे जिल्ह्याला आज 28 सप्टेंबर रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.24 तासासाठीचा हा रेड अलर्ट असून अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.मात्र सर्व आपत्तींचा सामना करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका सज्ज झाले आहे.कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोणतीही पूर परिस्थिती निर्माण झाली किंवा एखादी आपत्ती कोसळली तरी त्याचा सामना करण्यासाठी केडीएमसी मनपाचे सर्व यंत्रणा सज्ज झाल्या असून नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आव्हान केडीएमसी मनपाने केले.