Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Aug 22, 2025
फुलंब्रीतील मदतमाश सातबारा वर्ग दोन मध्ये असल्याने अनेक शेतकऱ्यांना शासकीय योजनेसाठी अडसर ठरत आहे. त्यामुळे शासनाच्या परिपत्रकानुसार छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान शिबीर अंतर्गत वर्ग दोन मध्ये असणाऱ्या अशा जमिनीवर एक मध्ये रूपांतरित केली जाणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी दिली आहे.