अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकाऱ्यास शिवीगाळ व धमकी दिल्याची घटना घडली असून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवानंद श्रीरामजी भुस्कट (वय 50, रा. माळीपुरा पथ्रोट, ता. अचलपूर) हे पांढरी ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.०४ वाजता ते दैनंदिन कामकाज पाहात असताना आरोपी मंगेश उर्फ पुरुषोत्तम प्रल्हाद कुथे (रा. पांढरी, ता. अंजनग