भंडारा जिल्ह्यातील किन्ही मोखे येथील शिवराम मेश्राम यांचे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा विर्सी येथील बचत खात्यातून एका अज्ञात मोबाईल क्रमांक वापरकर्त्याने मोबाईलची यूपीआयडी तयार करून यूपीआय ट्रांजेक्शनद्वारे अप्रामाणिकपणे वेळोवेळी 1 लाख 67 हजार 693 रुपये विड्रॉल करून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार दिनांक 7 जानेवारी 2024 ते 6 मे 2025 दरम्यान घडला. याप्रकरणी फिर्यादी संजय शिवराम मेश्राम वय 46 वर्षे यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथे दिनांक 26 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.