ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणात सोलापूर ग्रामीण सायबर पोलीसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. फिर्यादी उमेश काशीनाथ पाटील यांनी ॲमेझॉन ॲपवरून धुपस्टॅण्ड मागविला होता. पार्सल डिलेवरी न घेतल्यामुळे त्यांना व्हॉट्सॲपवरून कॉल करून फसवणूक करणाऱ्यांनी ₹५ शुल्क भरण्यास सांगितले. मात्र शुल्क भरताच त्यांच्या खात्यातून तब्बल ९०,००० रुपये डेबिट झाल्याचे आढळून आले. या प्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.