लातूर-जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. बाजारात सोयाबीनला हमीभावापेक्षा तब्बल एक हजार रुपयांनी कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. सध्या बाजारात सोयाबीनचे दर प्रती क्विंटल ४,५०० ते ४,६०० रुपयांदरम्यान आहेत, तर शासकीय हमीभाव ५,५७५ रुपये आहे.सोयाबीनचा हंगाम सुरू होताच मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी माल बाजारात आणला, मात्र दर घसरल्याने त्यांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली आहे. मागणी कमी व पावसामुळे अडचणीत आलेल्या गुणवत्तेच्या घटकांमुळे बाजारातील व्यवहार मंदावले