लातूर –ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, या मागणीसाठी बार्शी रोडवरील मुरुड अकोला येथे झालेल्या रस्तारोको आंदोलनात सहभागी झालेल्या दहा शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.सरकारपर्यंत आमच्या व्यथा पोहोचविण्यासाठी आंदोलन केले, मात्र आमच्यावरच गुन्हे दाखल करून सरकारने शेतकऱ्यांविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे, असा आरोप शेतकरी वर्गातून आज दिनांक 9 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता करण्यात आला.