राजेश जंगम नावाच्या व्यक्तीने समाज माध्यमावरील फेसबुकचा आधार घेत दि. 2 सप्टेंबर रोजी माजी सनदी अधिकारी रामदास पाटील सुमठानकर यांच्या विषयी तसेच दिव्यांग व्यक्ती विषयी अपमानास्पद टिपणी करत समस्त दिव्यांग व्यक्ती विषयी आक्षेपार्ह टिपणी केली असल्याने आजरोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास धर्माबाद पोलीस स्टेशन यांना निवेदन देत टिका करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी समस्त सुजाण नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे