मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे मनोज जरांगे यांचे गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेले उपोषण सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर आज मागे घेण्यात आले त्या अनुषंगाने वाशिम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि. २ सप्टेंबर रोजी स जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष माधवराव अंभोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.