अपघातांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या समृद्धी महामार्गावर आता दरोडेखोरांनी थैमान घालून व्यापाऱ्याचे पावणे पाच किलो सोने लंपास केले. या घटनेत व्यापाऱ्याच्याच चालकाने विश्वासघात करून दरोडेखोरांना मदत केल्याचे उघड झाले आहे. घटना २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फरदापूर टोलनाक्याजवळ घडली. व्यापारी अनिल शेशमलजी जैन चौधरी (रा. मुंबई) हे खामगावहून मुंबईकडे सोन्याचा ऐवज घेऊन इनोव्हा गाडीतून निघाले होते. चालकाने पोटदुखीचे कारण सांगत गाडी थांबवली.