लातूर -लातूर शहरातील आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनने एका अनोख्या उपक्रमांतर्गत पिंपळाच्या झाडाच्या खोडावर संपूर्णपणे स्वनिर्मित गणपतीची मूर्ती साकारली आहे. हे कार्य व्यावसायिक शिल्पकारांशिवाय, सर्वसामान्य, सर्वसमावेशक फाउंडेशन सदस्यांनी एकत्र येऊन १२ तास सलग मेहनत करून केले आहे. लाकडाचा भुसा, नारळाच्या कात्या, सिमेंटच्या रिकाम्या पोत्यांचा चुरा, मुलतानी माती, सिमेंट आणि थोडे बाइंडिंग मटेरियल यांचा उपयोग केला आहे