खोपोली नगरपरिषद हद्दीत विविध प्रभागात लाखो रुपये खर्च करून ओपन जिम उभारण्यात आले आहेत. मात्र या ओपन जिमच्या साधनांची दुरावस्था झाली. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत आम आदमी पार्टीचे पदाधिकारी डॉक्टर रियाज पठाण यांनी व्हिडिओच्या माध्यमातून पोलखोल केल्याचे पहावयास मिळत आहे.