भिवंडी परिसरात मध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने दुचाकी ला धडक दिली. जोरदार धडक बसल्याने दुचाकी वरील तीन जण तब्बल पन्नास मीटर लांब जाऊन पडले. यावर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याची पत्नी आणि मुलगी देखील जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.