लातूर- केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी धाराशिव दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांबाबत एक धक्कादायक विधान केले आहे. अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई सरकार करू शकत नाही, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी आता या नुकसानीची सवय लावून घ्यावी, असा अजब सल्लाही त्यांनी दिला. "आत्ताच जे तुम्हाला जे नुकसान दिसू लागलं ना हिची आता आपणला सवय करावी लागणार आहे. त्यातही वारंवार घडणार आहे" असे कृषी मूल्य आयोगाचे पाशा पटेल म्हणाले.