शहरातील घरोघरी स्थापण करण्यात आलेल्या घरघुती गणेश मुर्तींचे शहरातील गवराळा तलाव परीसरात नगर परिषद प्रशासनातर्फे उभारण्यात आलेल्या कृत्रीम कुंडात मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले.विसर्जनाची ही प्रक्रीया रात्रो ११ वाजेपर्यंत चालणार आहे. घरघुती गणेशमुर्तींचे विसर्जन हे कृत्रीम कुंडात करण्याचे आवाहन नगर परिषद प्रशासनातर्फे करण्यात आले होते.त्याला गणेशभक्तांनी प्रतिसाद दिला.विसर्जन प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी यासाठी तलावपरीसरात योग्य सुविधा देण्यात आल्या.