आम सभा हा विषय जवळ जवळ संपुष्टात येतो की काय ही भीती वाटते, परंतु मी मात्र या आमसभेची परंपरा कायम ठेवली आहे. एकाच वेळेला जनता, अधिकारी, आणि लोकप्रतिनिधी हे एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याचे एकमेव कारण आहे. हे एकमेव माध्यम आहे अशी प्रतिक्रिया गुहागर येथील श्री पूजा मंगल कार्यालय येथे आम सभा झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली.