विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्ये केबिनमध्ये चक्क पाच फूट लांबीची धामण जातीचा साप आढळल्याने पोलीस स्टेशनमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर सर्पमित्रांना पाचरणा केली असता सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले आणि अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर सर्पमित्रांनी पाच फूट लांबीच्या धामण जातीच्या सापाला रेस्क्यू केले,निसर्गाच्या सानिध्यात सोडणार असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित असलेल्या सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.