मालेगाव संगमेश्वर येथे शैक्षणिक साहित्यातून साकारली 18 फुटी गणरायाची मूर्ती, रोज मिळतो शालेय विद्यार्थ्यांना आरतीचा मान... Anc: मालेगाव संगमेश्वर डांगचे चाळे येथील श्रीकृष्ण गणेश मंडळ दरवर्षी विविध कलाकृतीतून गणरायाची मूर्ती साकारत असते. यावर्षी देखील या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी शैक्षणिक साहित्य म्हणजे पुस्तक, पाटी, पेन, पेन्सिल आदी साहित्यातून 18 फुटी गणरायाची मूर्ती साकारली असून यात रोज नवनवीन शाळेच्या विद्यार्थ्यांना या बाप्पाची आरती करण्याचा मान मिळत असतो.