जिल्ह्यातील आठही पंचायत समिती सभापती पदासाठी अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिलांसह आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्या अध्यक्षतेखाली दि.1 ऑक्टोंबर रोजी सभेचे सभेचे आयोजन करण्यात आले. सभेला जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्यस्तरीय मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे प्रतिनिधीं व इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.