नांदेड शहरातील नंदीग्राम सोसायटी येथे दि ७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास यातील आरोपी १) रणजितसिंग गोराया २) व्यंतकौर गोराया ३) हरप्रितसिंग गोराया यांनी यातील फिर्यादी अमरिंदरसिंग मान यांचे मुलाने फटाके वाजविल्याच्या कारणावरून फिर्यादीस मारहाण करून गंभीर दुखापत केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आज सायंकाळी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव आज करीत आहेत.