राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांनी आज दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी २ वा. दरम्यान भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना चांदपूर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. राज्यातील अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या शेतकरी बांधवांना (बळीराजाला) या संकटातून सावरण्याची शक्ती मिळावी, तसेच सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, यासाठी त्यांनी हनुमानजींच्या चरणी लीन होत मनोभावे प्रार्थना केली. राज्याच्या अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे....