सातारा लातूर महामार्गावर भिवडी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर पूर्वेस मॉर्निंग वॉकसाठी बाहेर आलेल्या सासू व सुनांच्या गळ्यातून पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी भल्या सकाळी चोरून नेले आहेत. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातून शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार काजल शंकर शेलार व त्यांच्या सासूबाई या गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता महामार्गावर मॉर्निंग वॉक करत असताना चोरीचा प्रकार घडला.