राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर हे आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच भंडारा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून दाखल झाले. याप्रसंगी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे विश्रामगृह भंडारा येथे सकाळी 11 वाजता दरम्यान माजी खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी सावन कुमार, पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी हजर होते.