तालुक्यातील दूधनगाव शिवारात एकाकडून अन्य शेतात वाळूचा साठा केला जात आहे. वाळूची वाहतूक करू देत नसल्याने शेतकऱ्यालाच धमकी देण्यात आली. याबाबतची तक्रार संबंधित शेतकऱ्याने पोलिस अधीक्षकांकडे काल गुरुवारी दि 18 एप्रिल रोजी सायंकाळी 5वाजता केली आहे.शिवाजीराव भोंडवे यांची दूधनगाव शिवारात दूधना नदीकाठावर शेती आहे. या शेतीमध्ये गावातील एकजण स्वतःच्या ट्रॉलीच्या साहाय्याने दूधना नदीपात्रातील अवैध वाळू उपसा करून शेत मालकाच्या परस्पर शेतामध्ये साठा करून त्याची विक्री करत आहेत.