मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईच्या आझाद मैदान येथे आरक्षसंदर्भात आमरण उपोषण चालू झाले आहे. त्यांना पाठिंबा म्हणून वसमत चे माजी नगरसेवक रवी किरण वाघमारे यांनी वसमतच्या उपविभागीय कार्यालयासमोर दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारापासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे .जोपर्यंत मनोज जरांगे पाटील उपोषण करतील तोपर्यंत मीही उपोषण करणार असल्याचं रविकिरण वाघमारे यांनी सांगितलं आता सरकार यावर काय भूमिका घेणार हेही पाहणे तितकच गरजेचे आहे .