विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता दिनांक 21 ऑगस्ट रोजी स. 11 ते 4 वाजता दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भवादी शेतकरी संघटनेचे नेते सदानंद धारगावे यांनी केले. या जन आक्रोश आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करण्यात यावी, सन २००६ ला पारित झालेला स्वामीनाथन आयोग तात्काल लागू करण्यात यावा, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे.