पुणे-पंढरपूर महामार्गावर हॉटेल पंचशीलसमोर झालेल्या भीषण अपघातात पाच वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला असून त्याची आजी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात शुक्रवार, दि.५ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात मृत्यू पावलेल्याचे नाव अविष जाधव (वय ५, रा. मगराचे निमगाव, ता. माळशिरस) असे आहे, तर गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव उज्वला बाळासाहेब मगर (वय ५५) असे आहे.