हिंगणघाट :विदर्भ महसूल सेवक संघटना, तालुका शाखा हिंगणघाटने महसूल सेवक (कोतवाल) पदाला चतुर्थ श्रेणीचा शासकीय दर्जा देण्याची जोरदार मागणी केली आहे. यासंदर्भात तहसीलदारामार्फत महसूल मंत्री महाराष्ट्र शासनाकडे निवेदन दिले ११ सप्टेंबर २०२५ पर्यंत मागणी मान्य न झाल्यास १२ सप्टेंबरपासून महसूल मंत्र्यांच्या क्षेत्रामध्ये बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.संघटनेचे म्हणणे आहे की, महसूल सेवक (कोतवाल) हे महसूल विभागाचे कणा असून, गावपातळीपासून ते जिल्हाधिकारी स्तरापर्यंत कामे करतात.