समुद्रपूर:सध्याच्या स्थितीत बदलत्या वातावरणाचा परिणाम तालुक्यातील अनेक शेतातील सोयाबीन पिकावर होतांना दिसुन येते आहे.यावेळी दोन दिवसाआधी हिरवगार असलेल्या कित्येक सोयाबीनच्या शेतात यलोमोझ्याकचा प्रादुर्भाव आढळून येत असून सोयाबीनचे पाने पिपळे येत आहे..यामुळे हाताशी आलेल सोयाबीनच पिक जाण्याची चिंता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली असून अनेक शेतकरी आपल पिक वाचवण्यासाठी महागड्या किटकनाशकांची फवारणी करीत आहे.तर याकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.