पाचोरा तालुक्यातील भातखंडे येथून 24 वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून अद्याप पावेतो विवाहिता मिळून न आल्याची माहिती आज दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 वाजता हाती आली आहे, भातखंडे येथील वाहन चालक विशाल गजानन कुमावत वय 32 वर्षे यांची पत्नी अंजली विशाल कुमावत वय 24 वर्षे हि दिनांक 15 ऑगस्ट रोजी राहते घरुन सकाळी 10:15 ला कुणाला काही एक न सांगता कुठेतरी निघुन गेली असुन तिचा आज पावेतो शोध घेतला असता ती मिळुन आली नाही,