पेण तालुक्यात भावपूर्ण वातावरणात अनंत चतुर्थीच्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. ग्रामीण भागासह पेण शहरातील घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. कुठे ढोल ताशांचा गजर, कुठे गुलाल, फुलांची उधळण तर कुठे भजनांच्या तालावर वाजतगाजत आनंदी वातावरणात बाप्पा चालले गावाला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला, मंगलमूर्ती मोरया, पायी हळूहळू चाला, मुखाने गजानन बोला अशी अर्थसाद घालीत विसर्जन करण्यात आले.