हिंगणघाट मतदारसंघात सोयाबीन पिकावर येलो मोझ्याक या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे.या रोगामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली असून आधीच निसर्गाच्या संकटाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर अतिवृष्टीस आणखी एक मोठा आर्थिक आघात झाला आहे.पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार समिरभाऊ कुणावार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.