आझाद मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा समाजाचे जथ्थे मुंबईकडे गेल्याने मुंबई जाम झाली आहे. त्यामुळे राज्य सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. शिवाय कोर्टाने मुंबईतील रस्ते मोकळे करुन देण्याचे आदेश दिलेत. मात्र, जालना जिल्ह्यातील मौजपुरी सह मराठवाड्यातून मराठा आंदोलक मुंबईकडे जातच आहेत. मंगळवारी रात्री देवगीरी एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना झालेले आंदोलक बुधवार दि. 2 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता मुंबईत दाखल झालेत. त्यामुळे मराठा आंदोलक मुंबईत दाखल होत आहेत.