महाड शहरातील करंजखोल येथील तरुणाने व्हॉट्सअपवर पवित्र कुराणविरोधात आक्षेपार्ह स्टेटस् ठेवताच शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले. या घटनेविरोधात संतप्त मुस्लीम समाज मोठ्या संख्येने शहर पोलीस ठाण्याच्या आवारात जमला व संबंधित तरुणाविरुद्ध तात्काळ कारवाईची मागणी केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून या तरुणाला ताब्यात घेतले आहे. मयूर मोतीराम महाडिक असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.