कोकणामध्ये गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यासाठी मुंबईमधील चाकरमानी माणसं गणेशोत्सवासाठी कोकणात जातात त्यासाठी रेल्वे विभागाने अतिरिक्त रेल्वे कोकणात सोडले असून त्याबरोबरच राज्य परिवहन महामंडळाने शेकडो बसेस कोकणामध्ये प्रवाशांना नेण्यासाठी सोडलेले आहेत याचा अनुषंगाने वाशिम जिल्ह्यातील वाशिम रिसोड मंगरूळपीर कारंजा या चार एसटी आगारातून प्रत्येकी 10 अशा 40 एसटी बसेस कोकणाकडे रवाना केल्या आहेत. त्यामुळ वाशिम जिल्ह्यातील प्रवाशांची मात्र मोठ्या प्रमाणात अडचण झाली.