लातूर- लातूर महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ पंजाबराव खानसोळे, मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेख, मुख्य स्वच्छता निरीक्षक रवी कांबळे, आरोग्य अधिकारी डॉ भारती यांनी यांनी आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी रविवारी सुट्टी असताना सुद्धा सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान वरवंटी कचरा डेपो येथे भेट देऊन ओला कचरा प्रक्रिया व सुका कचरा प्रक्रिया तसेच बायोगॅस प्रकल्प इत्यादी पाहणी करून कचरा प्रक्रिया बद्दल मार्गदर्शन करून सूचना केल्या.