शिवसेना शिंदे गट विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील हे बेपत्ता झाले आहेत.एक सप्टेंबर पासून ते बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली असून जळगाव शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. संजय पाटील हे एक सप्टेंबर रोजी धुळे येथील आपल्या घरून धरणगाव तालुक्यातील दोणगाव या आपल्या गावी जात असल्याचे सांगून निघाले होते. त्यानंतर ते जळगाव शहरात आले. त्यांनी एका बँकेतून काही रक्कम काढली. मात्र त्यानंतर ते घरी परतले नाहीत आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता ही माहिती समोर आली