कृषिप्रधान संस्कृतीतील शेतकर्यांच्या सर्जा-राजासाठीचा कृतज्ञतेचा सण बैलपोळा परभणी तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी येथे आज शुक्रवार 22 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकर्यांनी आपल्या बैलांची पारंपरिक रितीने विशेष सजावट केली होती. गळ्यात घंटा, पाठीवर रंगीबीरंगी कपडे आणि फुलांच्या माळा घालून औक्षण करून बैलांची पूजा केली. ढोल-ताशांच्या गजरात, मोठ्या मारुती मंदिर परिसरात बैलांची मिरवणूक काढली.