कर्जत तालुक्यातील नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावर दहिवली मालेगाव येथे उल्हास नदीवर गणेश विसर्जन सोहळा आयोजित केला होता.५००हून अधिक गणेश मूर्तीचे उल्हास नदीमधील वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करण्यात आले. दहिवली तर्फे वरेडी ग्रामपंचायतीचे माध्यमातून मागील तीन वर्षापासून शामियाना उभारून गणेश विसर्जन सोहळा साजरा केला जात आहे.