पिंपळखुटा येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप कवडे यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडितीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. दररोज ५-६ तास वीज जात असून, अनेकदा फक्त सिंगल फेजवर कमी व्होल्टेज दिला जातो. त्यामुळे ३ फेज लाईन व नवीन डीपी बसवावी, अशी मागणी झाली. इतर गावांत लोडशेडिंग नसताना पिंपळखुट्यातच अधिक होत असल्याचा आरोप करण्यात आला. ग्रामस्थांनी तातडीने सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी महावितरणकडे केली.