भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालय केसलवाडा/प. तर्फे भव्य महाआरोग्य शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रम दिनांक २९ सप्टेंबर रोजी दुपारी २:३० वा. दरम्यान उत्साहात पार पडला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी आमदार नाना पटोले यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. त्यांनी आरोग्य शिबिराची पाहणी करून व्यवस्थेची माहिती घेतली, तसेच स्वतः वृक्षारोपण करून या उपक्रमाची सुरुवात केली. या आरोग्य शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आरोग्य तपासणी करून घेतली. त्याचबरोबर, पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश...