अकोला शहरातील गुलजारपुरा भागात ६ सप्टेंबर रोजी एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तौहीद खान समीर खान या व्यक्तीने चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ दि. १० सप्टेंबरला दु. १ वा.शहरात भोई समाज, सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाद्वारे आरोपीस तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.