आज दि. 29 सप्टेंबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास मा. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने हदगाव तहसील कार्यालय येथे निवेदन दिले असून ज्यात शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करावी नदी नदीकाठच्या गावामध्ये चारा छावण्या सुरू करावेत, पिक विमा देण्यात यावा, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा आदि शेती निगडित मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.